आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात व्यवसायाचा विस्तार करणे, उत्पादनांची प्रभावी जाहिरात करणे आणि डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन अमृत संस्थेने आपल्या लक्षित घटकातील उद्योजकांसाठी "अमृतपेठ" हे स्वतंत्र ई-कॉमर्स व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
जालना, प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे, ज्यांना शासनाच्या स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ उपलब्ध होत नाही.
अमृत संस्थेमार्फत लक्षित घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध रोजगाराभिमुख योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे गृहउद्योग, लघुउद्योग, महिला उद्योजक व सूक्ष्म उद्योजकांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने "अमृतपेठ" ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात व्यवसायाचा विस्तार करणे, उत्पादनांची प्रभावी जाहिरात करणे आणि डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय टिकवून ठेवणे व वाढवणे हे प्रत्येक उद्योजकासाठी आवश्यक बनले आहे. मात्र, अनेक लघु व सूक्ष्म उद्योजकांना मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करणे सहज शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अमृत संस्थेने आपल्या लक्षित घटकातील उद्योजकांसाठी "अमृतपेठ" हे स्वतंत्र ई-कॉमर्स व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उद्योजकांना आपल्या व्यवसायाची माहिती, उत्पादनांची छायाचित्रे व विक्रीसाठी उपलब्ध वस्तू अपलोड करून व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादनांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार असून, व्यवसाय वृद्धीला नवी दिशा मिळणार आहे. तसेच ग्रामीण व लघुउद्योजकांना डिजिटल माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधीही प्राप्त होणार आहे.
डिजिटल युगात स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठेशी जोडण्याच्या दिशेने "अमृतपेठ" हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून, उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे.
अमृतच्या लक्षित घटकातील जास्तीत जास्त गृहउद्योग, लघुउद्योजक, महिला उद्योजक व व्यावसायिकांनी "अमृतपेठ" या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाची नोंदणी करून उत्पादनांची माहिती व छायाचित्रे अपलोड करावीत. या माध्यमातून आपल्या व्यवसायाला नवीन ग्राहकवर्ग, नवीन बाजारपेठ आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योजकांनी या डिजिटल व्यासपीठाचा लाभ घेत आपल्या व्यवसायाला नवीन चालना व नवी ओळख द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय,प्रशासकीय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालय, जालना फोन नंबर- 7391065474
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment