छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अमृत प्रतिनिधींचा दौरा
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आज (२६ डिसेंबर) संस्थेतर्फे दौरा करण्यात आला. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने वैजापूर तालुक्यातील विविध ठिकाणी नागरिक, व्यावसायिक आणि अन्य समाजघटकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या दौऱ्यात अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय चंद्रकांत लंबे आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंखे यांनी लक्ष्यित गटातील नागरिकांशी संवाद साधून अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
वैजापूर येथील नीलेश कुलकर्णी यांचे श्री आयटी सोल्युशन्स अँड सर्व्हिसेस हे सेतू सुविधा केंद्र असून, त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर मिळणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ब्राह्मण सेवा संघाचे वैजापूर तालुकाध्यक्ष सुमन लालसरे यांचीही भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. आगामी काळात तालुक्यातील लक्ष्यित गटातील समाजाची बैठक घेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजनांची माहिती पोहोचवण्याबाबत चर्चा झाली. प्रतीक कोल्ड्रिंक्सचे मालक प्रतीक पारिक यांचीही भेट घेण्यात आली. त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजना, तसेच वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेची माहिती देण्यात आली. या योजनेमुळे व्यवसायिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
अमृत संस्थेच्या कोणत्याही योजनेसाठी लक्ष्यित गटातील समाजाकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही, हे अक्षय लंबे आणि रामेश्वर साळुंखे यांनी स्पष्ट केले.
समाजासाठी, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे नागरिकांनी सांगितले. अशा प्रत्यक्ष भेटींमुळे शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी..
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment