परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची अमृत सक्षम संदर्भात भेट

अमृत सक्षम उपक्रमासाठी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांची अमृत संस्थेचे परभणी जिल्हाचे व्यवस्थापक अनिरुद्ध काटे व उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी यांनी भेट घेतली. या भेटीत अमृत सक्षम मार्फत रोजगारनिर्मिती चालना देणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची अमृत सक्षम संदर्भात  भेट मुख्य फोटो
परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची अमृत सक्षम संदर्भात  भेट अतिरिक्त फोटो

अमृत सक्षम उपक्रमासाठी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांची अमृत संस्थेचे परभणी जिल्हाचे व्यवस्थापक अनिरुद्ध काटे व उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी यांनी सकारात्मक भेट घेतली. या भेटीत अमृत सक्षम मार्फत रोजगारनिर्मिती चालना देणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील स्वच्छता, कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि त्यातून उद्योगनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका व अमृत संस्था यांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.

यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांचे स्वागत करत, भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. या उपक्रमात अंतर्गत महिला बचत गट, युवक, युवती, नव उद्योजक, एनजीओ इत्यादीना या उपक्रमार्गत सहभागी होता येईल.या उपक्रमाचा मुख्य उद्देश कचऱ्यापासून उद्योग व उद्योगातून स्वावलंबन हा आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 04:51 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 04:51 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement