ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत आधुनिकतेची नवी दिशा; ड्रोन प्रशिक्षणामुळे वाढला आत्मविश्वास- गंगाखेडचे प्रशिक्षणार्थी परांडकर

अमृत संस्थेच्या ड्रोन मिशन अंतर्गत शेती फवारणी या विषयात ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या गंगाखेड येथील श्रीपाद परांडकर यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यात ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले.

ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत आधुनिकतेची नवी दिशा;  ड्रोन प्रशिक्षणामुळे वाढला आत्मविश्वास-  गंगाखेडचे प्रशिक्षणार्थी परांडकर  मुख्य फोटो
ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीत आधुनिकतेची नवी दिशा;  ड्रोन प्रशिक्षणामुळे वाढला आत्मविश्वास-  गंगाखेडचे प्रशिक्षणार्थी परांडकर  अतिरिक्त फोटो

अमृत संस्थेच्या ड्रोन मिशन अंतर्गत शेती फवारणी या विषयात ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या गंगाखेड येथील श्रीपाद परांडकर यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे आधुनिक शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे. "अमृत संस्थेने दिलेले ड्रोन प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार, प्रात्यक्षिकांवर आधारित आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले. ड्रोनद्वारे फवारणी केल्यास वेळ, मजुरी आणि औषधांचा खर्च कमी होतो, तसेच पिकांवर अचूक व प्रभावी फवारणी करता येते. प्रशिक्षकांनी ड्रोनचे सुरक्षित संचालन, देखभाल आणि प्रत्यक्ष फवारणीची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे आत्मविश्वास वाढला असून भविष्यात ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्याची प्रेरणा मिळाली आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवक आणि शेतकऱ्यांसाठी रोजगार व आधुनिक शेतीचे नवे दालन खुले करणारे असल्याचे सांगून याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व अमृत संस्थेचे आभार मानले."

अमृत संस्थेविषयी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी येथे भेट द्यावी किंवा 7391065473 या क्रमांकावर संपर्क साधावा. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 03:47 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 03:47 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement