तहसीलदार मॅडम यांनी त्यांच्या कार्यालया अंतर्गत होणाऱ्या कामकाज व प्रक्रिया यांची माहिती दिली.
सांगली : दिनांक २० जुलै २०२६ रोजी सांगली शासकीय कार्यालय संवाद सेतू उपक्रमांतर्गत अप्पर तहसीलदार कार्यालय व सेतू कार्यालय सांगली येथे विद्यार्थ्यांना शासकीय प्रक्रिया व दाखले देण्याची पद्धत याबद्दल माहिती देण्यात आली. सर्वप्रथम अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे व नायब तहसीलदार मनोहर पाटील यांची भेट घेण्यात आली. तहसीलदार वरुटे मॅडम यांनी त्यांच्या कार्यालयांतर्गत होणाऱ्या कामकाज व प्रक्रिया यांची माहिती दिली. महसूल विभागाचे कामकाज, ७/१२ उतारे, जमीन नोंद, कुळ, विविध तक्रारी, सुनावणी व इतर प्रक्रिया यांची माहिती दिली. तसेच निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अन्य विषयांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर माहिती दिली व शंकांचे निरसन केले. सेतू कार्यालयात कर्मचारी राजू पाटील यांनी दिले जाणारे विविध दाखले, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि काही कमी असल्यास त्यासाठी लागणारी पर्यायी कागदपत्रे यांची माहिती दिली. यासाठी असलेल्या ऑनलाईन प्रक्रिया, त्याची शासकीय फी व काम पूर्ण होण्याची मुदत याची माहिती दिली.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अमृत कार्यालयातील अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी विविध महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन शैलेंद्र जहागिरदार यांनी केले. सोबत अमृत सखी गौरी कुलकर्णी उपस्थित होत्या.
-संकलित
अमृत संस्थेविषयी अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/ अधिक माहिती साठी संपर्क : ९११२२२८७६६ / ७०५७६०७४१९/७९७२८३०७५७ महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली ४१६४१६
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment