चंद्रपूर येथील ब्राह्मण सभेला भेट देऊन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास व रोजगाराभिमुख योजनांची उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी अमृतच्या माध्यमातून युवक, युवती, महिला तसेच इच्छुक नागरिकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांशी लाभार्थ्यांना जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अमृतची भूमिका, मार्गदर्शन सुविधा आणि प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या संधींबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय चंद्रपूर येथे लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या बेकरी प्रशिक्षण, अमृत अन्नपूर्णा प्रशिक्षण तसेच IGTR प्रशिक्षण याविषयी माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाची उद्दिष्टे, पात्रता, नोंदणी प्रक्रिया, कालावधी तसेच प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना अमृत योजनेचे माहितीपत्रक वितरित करण्यात आले. उपस्थितांनी अमृतच्या विविध योजनांचे स्वागत करत आगामी प्रशिक्षणांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली; तसेच या योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774 अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, वत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment