महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने वरोरा येथील वैशाली पद्मावार यांच्या निवासस्थानी आर्य वैश्य कोमटी समाजातील महिलांची बेकरी प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन बैठक दिनांक १८ जुलै रोजी उत्साहात पार पडली.
या बैठकीत महिलांना बेकरी उद्योगाचे महत्त्व, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच प्रशिक्षणाद्वारे स्वतःचा उद्योग कसा उभारता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच अमृतच्या विविध रोजगाराभिमुख व उद्योजकता विकास योजनांचीही सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत उपस्थित महिलांनी प्रशिक्षणाबाबत उत्सुकता व्यक्त करत विविध शंकांचे निरसन करून घेतले. तसेच आगामी बेकरी प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी वैशाली पद्मावर, प्रांजली पोलशेट्टीवार, शर्वरी भृगुवर, सीमा गुंडावार, मीना मल्लुरवार उपस्थित होत्या. या बैठकीमुळे महिलांमध्ये स्वयंरोजगाराबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अमृतच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षण व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774, 9607443742 अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, वत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment