श्री सरस्वती सुपर इंटरनॅशनल किड्स स्कूल येथे अमृत सखी मंजू कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत वर्ग उत्साहात पार पडला. प्रार्थना गीत, विविध खेळ आणि प्रेरणादायी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. शाळेतील शिक्षिकाही यावेळी उपस्थित होत्या.
आज छ. संभाजीनगर येथे श्री सरस्वती सुपर इंटरनॅशनल किड्स स्कूल मध्ये अमृत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) अंतर्गत अमृत वर्ग उत्साहात पार पडला. हा अमृत वर्ग अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत विविध मनोरंजक व बौद्धिक खेळ घेण्यात आले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, आणि आनंदी शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अमृत वर्गाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अमृत वर्गाच्या उपक्रमांचे स्वागत केले. अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रार्थनेचे महत्त्व, चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि खेळातून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे अमृत वर्ग अत्यंत उपयुक्त असून, पुढील काळातही विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम अमृत वर्गाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment