महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने नांदगाव पेठ येथे ‘अमृत-सक्षम’ घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाबाबत जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला परिसरातील महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी अमृतचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक यांनी उपस्थितांना घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधी, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, आवश्यक प्रशिक्षण तसेच अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करून पर्यावरण संरक्षणासोबत रोजगार निर्मिती कशी करता येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस महिलांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थिती लावली. उपस्थित महिलांनी ‘अमृत-सक्षम’ उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिसाद देत घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याची तयारी दर्शविली. बैठकीदरम्यान उपस्थित महिलांनी घनकचरा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी केली. प्रशिक्षण मिळाल्यास व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीमुळे परिसरातील महिलांमध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, ‘अमृत-सक्षम’ उपक्रमाला नांदगाव पेठ येथे सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय-अमृत किंवा खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अमृत परिवारातर्फे करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक- ९११२२२७६३५
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment