जिल्हा कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात अमृतच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने जी. एस. कॉलेज, खामगाव येथे आयोजित जिल्हा कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माहितीपर स्टॉलला युवक-युवती, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात अमृतच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

जिल्हा कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात अमृतच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद खामगाव (जि. बुलढाणा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने जी. एस. कॉलेज, खामगाव येथे आयोजित जिल्हा कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माहितीपर स्टॉलला युवक-युवती, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमृतच्या स्टॉलद्वारे राज्य शासनाच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये ब्युटी पार्लर, बेकरी, फॅशन डिझायनिंग, अन्न प्रक्रिया, सोलर पीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स, ड्रोन प्रशिक्षण, उद्योजकता विकास (EDP) तसेच विविध रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया, शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास भेट देणाऱ्या अनेक युवक-युवतींनी अमृतच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उत्सुकता दाखवत नोंदणी केली. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, युवकांना उद्योग व व्यवसायाकडे प्रोत्साहित करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा अमृतचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या माहितीपर स्टॉलमुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले असून, अमृतच्या कार्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मेळाव्यात अमृतच्या स्टॉलला दिवसभर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 11:52 AM News publication time | Views: 139 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 11:52 AM News publication time | Views: 139 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement