अमृत व अनुलोम संस्थांचा समन्वयातून अमृतच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्या निर्धार

शासनाच्या विविध योजना व विकासात्मक उपक्रमांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अनुलोम सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अमृत जिल्हा कार्यालयाला भेट दिली.

अमृत व अनुलोम संस्थांचा समन्वयातून अमृतच्या विविध  योजना  तळागाळापर्यंत  पोहोचविण्या निर्धार मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : शासनाच्या विविध योजना व विकासात्मक उपक्रमांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अनुलोम सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अमृत जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती, महिला, विद्यार्थी, उद्योजक व बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकास, शैक्षणिक मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रोत्साहन, व्याज परतावा योजना तसेच विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीचे कार्य करत आहे.

यासोबतच ड्रोन प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यक्रम, रोजगार व व्यवसाय संधीविषयक मार्गदर्शन यांसारखे उपक्रमही राबविले जात आहेत.

अनुलोम संस्था शासनाच्या विविध योजना, सामाजिक उपक्रम आणि जनजागृती मोहिमा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे जनसेवक ग्रामीण भागात व्यापक जनसंपर्क ठेवून नागरिकांच्या समस्या व गरजा जाणून घेण्याचे काम करतात. यामुळे अमृतच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व लाभाच्या संधी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन्ही संस्थांनी समन्वयाने कार्य करण्याबाबत चर्चा केली.

यावेळी बीड जिल्हा भाग जनसेवक किशोर काकडे, गेवराई भाग जनसेवक पांडुरंग गावडे, आष्टी-पाटोदा-शिरूर भाग जनसेवक जालिंदर सुरवसे, परळी भाग जनसेवक दयाराम आघाव, माजलगाव भाग जनसेवक अशोक धुमाळ तसेच अंबाजोगाई-केज भाग जनसेवक गोविंद तांदळे उपस्थित होते.

बैठकीत युवक, युवती, महिला, विद्यार्थी आणि उद्योजकांपर्यंत अमृतच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे तसेच समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविणे याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अनुलोमच्या पदाधिकाऱ्यांनी अमृतच्या जनहितकारी उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 10:49 AM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 10:49 AM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement