अहिल्यानगर मध्ये "अमृत सक्षम"घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाला अहिल्यानगर महानगरपालिकेचे सहकार्य मिळणार.
अहिल्यानगर :"अमृत सक्षम"घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाला अहिल्यानगर महानगरपालिकेचे सहकार्य मिळणार. अमृत सक्षम -घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाच्या अनुषंगाने अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री.यशवंत डांगे यांची भेट घेऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेकडून त्यांच्या सोसिअल मीडिया पेज वर बातमी प्रसारित केली जाणार तसेच या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य,करण्यात येईल, अशी सकारात्मक ग्वाही त्यांनी दिली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment