अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अविनाश उखंडे व नागेश लामदाडे यांनी आज अमृत कार्यालय, लातूर येथे सदिच्छा भेट देऊन कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.

  अण्णासाहेब पाटील आर्थिक  विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अविनाश उखंडे व नागेश लामदाडे यांनी आज अमृत कार्यालय, लातूर येथे सदिच्छा भेट देऊन कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी अमृत कार्यालयातील अधिकारी श्री शुभम मुळजकर व श्री चिंतेश जोशी यांनी रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, व्याज परतावा योजना तसेच इतर शासकीय योजनांची माहिती देत त्यांच्या अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन केले. विविध योजनांद्वारे युवकांना उपलब्ध होणाऱ्या संधींबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांनी अमृतच्या कार्याचे कौतुक करत, या योजनांचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रचार व प्रसार करण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. तसेच दोन्ही संस्थांच्या समन्वयातून अधिकाधिक युवकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली. यावेळी परस्पर समन्वयातून शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 05:08 PM News publication time | Views: 823 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 05:08 PM News publication time | Views: 823 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement