अमृत आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अमृत-सक्षम घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाची माहिती अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे व अमृत सखी रूचा शर्मा यांनी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांना दिली.
छत्रपती संभाजीनगर : अमृत आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशनच्या वतीनं सुरू असलेल्या अमृत-सक्षम घनकचरा व्यवस्थापन उपक्रमासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रूचा शर्मा यांनी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. तसेच अमृत आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर 'अमृत-सक्षम' हा घनकचरा व्यवस्थापनावर आधारित उद्योजकता विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून फुलांच्या कचऱ्यापासून अगरबत्ती, नारळाच्या कचऱ्यापासून कोकोपीट, बागेतील कचऱ्यापासून बायो पॅलेट्स तसेच ई-वेस्टवर आधारित उद्योग उभारण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणीबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सहभागी युवक-युवती, महिला बचत गट, उद्योजक आणि इच्छुक नागरिकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, बाजारपेठेशी जोडणी आणि शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
यावेळी त्यांना उपक्रमाची सगळी माहिती सांगण्यात आली. शहरात या उपक्रमाची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, युवक-युवतींना यात सहभागी होता यावं आणि महापालिकेनं या कामात सहकार्य करावं असेही सांगण्यात आले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment