नंदनगरीत झाला अमृत संवाद सेतू उपक्रम संपन्न

नंदुरबार येथील तहसीलदार कार्यालयाचा दालनात 25 ते 30 विध्यार्थी -विद्यार्थिनी घेतला तहसीलदार कार्यालयाचा संवाद स्वतः तहसीलदार प्रदीपकुमार पवार साहेबांनी केल मार्गदर्शन

नंदनगरीत झाला अमृत संवाद सेतू उपक्रम संपन्न मुख्य फोटो
नंदनगरीत झाला अमृत संवाद सेतू उपक्रम संपन्न अतिरिक्त फोटो

आज नंदुरबार तहसीलदार कार्यलयात अमृत सवांद सेतू कार्यक्रम घेण्यात आला तहसीलदार प्रदिपकुमार पवार यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागा बद्दल सविस्तर माहिती दिली त्यात पुरवठा विभाग, महसूल विभाग, मतदान विभाग असे सर्वच विभाग बद्दल माहिती दिली- कागदपत्रे कशी तयार करायची? कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे ?कोणते विभागात गेले पाहिजे ?वयाची अट काय असते ? विविध योजनांचे लाभ कसे मिळतात ?कोणाला मिळतात ? अशा अएंक प्रश्नांची विद्यार्थ्यांना समर्पक उत्तरे मिळाली. बाहेरील कोणते विभाग तहसीलदार कार्यालय अंतर्गत येतात जवळपास तासभर मा. प्रदीपकुमार पवार यांनी विद्यार्थी, विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि तहसीलदार कार्यालय संदर्भात अचूक माहिती झाली. भविष्यात ही सगळी माहिती त्यांच्या नक्कीच उपयोगी पडेल अशी त्यांची प्रतिक्रिया होती. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या प्राध्यापकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी दुर्गाबाई रघुवंशी महाविद्यालय व गव्हर्नमेंट आय.टी.आय. चे २५ ते ३० विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी केले आणि आभार अमृत मित्र दिनेश पाठक यांनी मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 04:02 PM News publication time | Views: 180 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 04:02 PM News publication time | Views: 180 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement