अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी बुलढाणा : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृषी, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, औद्योगिक निरीक्षण तसेच विविध तांत्रिक सेवांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींना ड्रोनचे सुरक्षित संचालन, तांत्रिक हाताळणी, नियम व सुरक्षा, देखभाल आणि व्यावसायिक वापर याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात वैष्णवी भालेराव, राखी सेवक, चैतन्य जोशी, उमा परिहार आणि अक्षय परिहार यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून भविष्यात ड्रोन क्षेत्रात करिअर घडविण्याचा तसेच स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचा निर्धार व्यक्त केला. ड्रोन तंत्रज्ञान हे भविष्यातील महत्त्वाचे कौशल्य मानले जात असून, अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना नवीन तंत्रज्ञानाची ओळख, रोजगारक्षम कौशल्ये आणि उद्योजकतेसाठी आवश्यक आत्मविश्वास मिळत आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे हे राज्यातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने राबवत आहे. या उपक्रमांना युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी काळातही अशा कौशल्यविकास कार्यक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 03:21 PM News publication time | Views: 399 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 03:21 PM News publication time | Views: 399 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement