बजरंग दल विदर्भ प्रांताचे महासंयोजक दिपक पाटवणी यांची आज अमृत कार्यालयास भेट. अमृत फ्रूट मार्टबद्दल चर्चा

बजरंग दल विदर्भ प्रांताचे महासंयोजक दिपक पाटवणी यांनी आज अमृत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या विविध सामाजिक, कौशल्य विकास, रोजगरनिर्मिती व उद्योजकता विकास उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी अमृत फ्रूट मार्टबद्दल चर्चा केली.

बजरंग दल विदर्भ प्रांताचे महासंयोजक दिपक पाटवणी यांची  आज अमृत कार्यालयास भेट. अमृत फ्रूट मार्टबद्दल चर्चा मुख्य फोटो
मुख्य फोटो

बजरंग दल विदर्भ प्रांताचे महासंयोजक दिपक पाटवणी यांनी आज अमृत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या विविध सामाजिक, कौशल्य विकास व रोजगाराभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणारे युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, ड्रोन प्रशिक्षण, उद्योजकता विकास (ईडीपी), तसेच विविध जनकल्याणकारी योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महासंयोजक संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती देत भविष्यात सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. तसेच अमृत फ्रूट मार्टच्या माध्यमातून दर्जेदार व ताजी फळे थेट ग्राहकापर्यन्त पोहचविणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे व युवकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावर चर्चा झाली महासंयोजकांनी अमृत संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचे व शेतकरी हिताच्या उपक्रमांचे कौतुक करत, अशा संकल्पनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला

Publisher: साक्षी कुळकर्णी News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 10:46 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: साक्षी कुळकर्णी News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 10:46 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement