ब्युटी पार्लर प्रशिक्षणातून उद्योजकतेकडे प्रवास

अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात अमृत संस्थेच्या उपक्रमातून महिला सक्षमीकरण

ब्युटी पार्लर प्रशिक्षणातून उद्योजकतेकडे प्रवास मुख्य फोटो
मुख्य फोटो

अकोला : अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात महिला उद्योजक घडवण्याच्या उद्देशाने अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांनी ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम राबवला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे व त्यांचे आर्थिक सशक्तीकरण साधणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

प्रशिक्षणात सहभागी महिलांना फेशियल, मेकअप, हेअरकट, मेंदी, स्किन केअर, हेअर स्टायलिंग यासारख्या कौशल्यांसोबत ग्राहक सेवा, स्वच्छता आणि व्यवसाय व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन दिले जाते. प्रशिक्षण पूर्णतः अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रात्यक्षिकांवर आधारित असून, महिलांना व्यवसायात उतरता यावे असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण केला जातो.

या प्रशिक्षणामुळे बाळापूर तालुक्यातील अनेक महिला स्वयंरोजगाराकडे वळत आहेत आणि उद्योजकतेचा मार्ग धरत आहेत. काही महिलांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरबसल्या सेवा देऊन उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे महिला फक्त आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात असे नव्हे, तर त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि समाजात प्रतिष्ठादेखील प्राप्त होत आहे.

यात सहभागी झालेल्या काही महिलांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथे देत आहोत.

“आम्ही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नक्कीच स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करू आणि घरच्या उत्पन्नात वाढ करू.”

“पूर्वी आम्ही फक्त स्वप्न पाहायचो, आता ते प्रत्यक्ष व्यवसायात बदलण्याची संधी मिळाली आहे.”

“या प्रशिक्षणाने आम्हाला फक्त कौशल्ये शिकवली नाहीत, तर स्वतःवर विश्वास ठेवायला आणि समाजात आपली ओळख निर्माण करायला शिकवले.”

हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळापूर तालुक्यातील महिलांचा व्यवसाय सुरू होईल आणि त्यांच्या आयुष्यात नव्या संधी तयार होतील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास स्थानिक अधिकारी व्यक्त करतात.

बाळापूर तालुक्यात सुरू झालेला हा प्रशिक्षण उपक्रम महिला उद्योजकतेचा नवा अध्याय उघडत आहे. यामुळे तालुक्यातील महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळत असून, समाजात त्यांची ओळख निर्माण होत आहे आणि उद्योजकतेच्या दिशेने त्यांचे पाऊल टाकले जात आहे. महिलांच्या उत्साही आणि प्रेरणादायी प्रयत्नांमुळे बाळापूर तालुका लवकरच महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात आदर्श ठिकाण म्हणून ओळखला जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 04:24 PM News publication time | Views: 528 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 04:24 PM News publication time | Views: 528 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words