अमृत पर्यटन योजनेअंतर्गत पंढरपूर-अरण धार्मिक सहलीचा उत्साहात प्रारंभ

अमृत योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अमृत पर्यटन धार्मिक सहलीचा शिक्रापूर येथील राऊतवाडी परिसरातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

अमृत पर्यटन योजनेअंतर्गत पंढरपूर-अरण धार्मिक सहलीचा  उत्साहात प्रारंभ मुख्य फोटो
अमृत पर्यटन योजनेअंतर्गत पंढरपूर-अरण धार्मिक सहलीचा  उत्साहात प्रारंभ अतिरिक्त फोटो

अमृत पर्यटन योजनेअंतर्गत पंढरपूर-अरण धार्मिक सहलीचा उत्साहात प्रारंभ

अमृत योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अमृत पर्यटन धार्मिक सहलीस शिक्रापूर येथील राऊतवाडी परिसरातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या सहलीमध्ये भाविकांना श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दर्शन तसेच श्री संत सावता महाराज समाधी मंदिर, अरण येथे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर धार्मिक सहलीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिलांसाठी अर्धे तिकीट, पुरुषांसाठी पूर्ण तिकीट तर ज्येष्ठ अमृत नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यात्रेदरम्यान सहभागी भाविकांसाठी एक वेळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच धर्मशाळेमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहल रवाना होण्यापूर्वी बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी संघाचे प्रांत ग्रामविकास सदस्य श्री तानाजी तात्या राऊत, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री भरत म्हेत्रे, श्री सुनील भूमकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. उषाताई राऊत तसेच सौ. मोहिनीताई मांढरे व अमृत मित्र श्री कमलाकर कुलकर्णी व परिवहन महामंडळ चे ड्रायव्हर व कंडक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी धार्मिक पर्यटनामुळे समाजात आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असून नागरिकांना एकत्र येण्याची आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी मिळत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अल्प खर्चात तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी अमृत मित्र श्री कमलाकर कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी अमृतच्या विविध सामाजिक, कौशल्य विकास, स्वयंरोजगार व पर्यटन विषयक योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली व भविष्यातही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. धार्मिक घोषणांनी आणि विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांनी आनंदी वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत अमृत संस्थेच्या या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 11:07 PM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 11:07 PM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement