धुळे शहरात फॅशन डिझायनिंग क्षेत्राकडे तरुणींचा वाढता कल

अमृत संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमामुळे मिळाला स्वावलंबनाचा मार्ग

धुळे शहरात फॅशन डिझायनिंग क्षेत्राकडे तरुणींचा वाढता कल मुख्य फोटो
मुख्य फोटो

धुळे : आजच्या आधुनिक युगात फॅशन डिझायनिंग हे एक आकर्षक आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. बदलती जीवनशैली, सोशल मीडिया आणि चित्रपटसृष्टी यामुळे फॅशनबद्दलची आवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः तरुण पिढी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे धुळ्यात फॅशन डिझायनिंगचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. तीस दिवसांचे हे प्रशिक्षण मोफत असून, महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने ते सुरू करण्यात आले आहे.

या फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कपड्यांची रचना, रंगसंगती, कापडाची निवड, तसेच नवीन ट्रेंडचा अभ्यास करून घेतला जात आहे. त्यामुळे सर्जनशीलतेला वाव मिळत आहे. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट, बुटीक मालक, फॅशन सल्लागार अशा विविध रोजगार संधी उपलब्ध होतात. तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीनेही फॅशन डिझायनिंग अत्यंत उपयुक्त ठरत आहे. एकूणच, फॅशन डिझायनिंग केवळ कपड्यांपुरते मर्यादित न राहता एक व्यापक व उज्ज्वल भविष्य असलेले क्षेत्र बनले आहे.

फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना डिझायनिंग, कटिंग, स्टिचिंग, फॅब्रिक सिलेक्शन, ट्रेंड अ‍ॅनालिसिस व ग्राहक व्यवस्थापन यांसारखी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत व एमसीईडी संस्थेच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन, तसेच लागणारे सर्व सहकार्य वेळोवेळी करण्यात येणार आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: वैशाली कुलकर्णी News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: वैशाली कुलकर्णी News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words