चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमध्ये विविध समाजघटकांना अमृत योजनांची दिली माहिती

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने दिनांक १५ जुलै २०२६ रोजी विभागीय उपव्यवस्थापक श्री. विक्रममोहन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथे विविध समाजबांधवांच्या भेटी घेऊन अमृत योजनांची जनजागृती करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमध्ये विविध समाजघटकांना अमृत योजनांची दिली माहिती  मुख्य फोटो
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमध्ये विविध समाजघटकांना अमृत योजनांची दिली माहिती  अतिरिक्त फोटो

यावेळी सर्वप्रथम आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री. सतीश उपलंचिवार तसेच समाजातील मान्यवरांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाजातील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात सहभागी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर कन्यका परमेश्वरी मंदिर, गडचांदूर येथे आर्य वैश्य समाजातील महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकीत महिलांना बेकरी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवणकला व फॅशन डिझाईन, अगरबत्ती व मेणबत्ती निर्मिती, मसाला व पापड उद्योग, खाद्य प्रक्रिया, डिजिटल कौशल्य प्रशिक्षण तसेच विविध गृहउद्योग प्रशिक्षण यांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः बेकरी प्रशिक्षण व गृहउद्योग प्रशिक्षणाबाबत महिलांनी मोठी उत्सुकता दाखवली असून, सामूहिक पद्धतीने प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करण्याची तयारी दर्शविली. अनेक महिलांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर ब्राह्मण समाजाचे डॉ. साहनी तसेच श्री. रवि तिवारी यांची भेट घेऊन अमृतच्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार व उद्योजकता संधी तसेच युवक-युवतींसाठी उपलब्ध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत अमृतच्या योजना पोहोचविण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अमृतच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार उपक्रमांमुळे युवक-युवतींसह महिलांमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, गडचांदूर येथील या जनजागृती अभियानाला विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी अमृत मित्र सतीश नारायनदास उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774 अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, वत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 05:55 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 05:55 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Ashish Pratapwar
17-07-2026 01:44 PM

खूप छान योजना आहे महाराष्ट्र सरकारची, खुल्या प्रवर्गातील लोक खऱ्या अर्थाने शासनाच्या योजनांपासून दूर होते. आपल्या अमृतच्या माध्यमातून सर्व समाज या योजनांचा लाभ घेऊ शकतो. खुल्या प्रवर्गातील युवकांसाठी स्वयं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारची सुद्धा सकारात्मकता याच्यातून दिसून येते.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement