गुणवत्तेला मिळाली शासनाची साथ- कोल्हापूरच्या सुशांत प्रभावळकरांना अमृतचे अर्थसहाय्य

कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सुशांत प्रशांत प्रभावळकर यांची महाराष्ट्र शासनाच्या अमृतच्या विशेष अर्थसहाय्य योजनेसाठी निवड झाली असून, या योजनेअंतर्गत त्यांना प्रतिमहिना ₹१०,००० याप्रमाणे पहिल्या सहा महिन्यांसाठी ₹६०,००० इतके अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

गुणवत्तेला मिळाली शासनाची साथ- कोल्हापूरच्या सुशांत प्रभावळकरांना अमृतचे अर्थसहाय्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सुशांत प्रशांत प्रभावळकर यांची महाराष्ट्र शासनाच्या अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी – AMRUT) यांच्या विशेष अर्थसहाय्य योजनेसाठी निवड झाली असून, या योजनेअंतर्गत त्यांना प्रतिमहिना ₹१०,००० याप्रमाणे पहिल्या सहा महिन्यांसाठी ₹६०,००० इतके अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सुशांत प्रभावळकर हे सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), वडोदरा येथे उच्च शिक्षण घेत आहेत. देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी AMRUT मार्फत ही विशेष अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते.

या योजनेनुसार AIIMS, IIT, IIM आणि IIIT या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रतिमहिना ₹१०,००० इतके प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देण्यात येते. प्रत्येक शैक्षणिक वर्षात ११ महिन्यांपर्यंत ही मदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक सत्र यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दोन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सुशांत यांच्या यशाबद्दल त्यांचे पालक, शिक्षक, मित्रपरिवार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: अभिजीत कुलकर्णी कोल्हापूर News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 05:38 PM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: अभिजीत कुलकर्णी कोल्हापूर News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 05:38 PM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement