'घरच्या चवीतून' व्यवसायाची नवी ओळख; अमृत अन्नपूर्णा (क्लाउड किचन) प्रशिक्षण पुण्यात दि.२१ व २२ जुलै रोजी

घरगुती स्वयंपाक कौशल्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन महिलांसह युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे २१ व २२ जुलै २०२६ रोजी पुण्यात अमृत अन्नपूर्णा 'क्लाउड किचन ट्रेनिंग प्रोग्राम' आयोजित करण्यात आला आहे.

 'घरच्या चवीतून' व्यवसायाची नवी ओळख; अमृत अन्नपूर्णा (क्लाउड किचन) प्रशिक्षण पुण्यात दि.२१ व २२ जुलै रोजी  मुख्य फोटो
मुख्य फोटो

घरगुती स्वयंपाक कौशल्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन महिलांसह युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे २१ व २२ जुलै २०२६ रोजी पुण्यात अमृत अन्नपूर्णा 'क्लाउड किचन ट्रेनिंग प्रोग्राम' आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या या विशेष प्रशिक्षणात क्लाउड किचन व्यवसाय सुरू करण्यापासून ते तो यशस्वीपणे चालविण्यापर्यंतचे सर्व पैलू तज्ज्ञांकडून शिकविण्यात येणार आहेत.


अलीकडच्या काळात ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांचा वाढता वापर आणि घरगुती खाद्यपदार्थांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अमृत संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या गृहिणी, तरुण-तरुणी तसेच नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


प्रशिक्षणादरम्यान FSSAI नोंदणी व परवाना प्रक्रिया, Swiggy आणि Zomato वर व्यवसायाची लिस्टिंग, मेनू नियोजन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन यांसह व्यवसायाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.


महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे, युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे अमृत संस्थेकडून सांगण्यात आले. प्रशिक्षणाद्वारे सहभागींच्या व्यवसाय संकल्पनेपासून प्रत्यक्ष विक्रीपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.


प्रशिक्षणासाठी मर्यादित प्रवेश असून हे प्रशिक्षण अमृत संस्थेच्या लक्षित गटासाठी असेल. 'प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर सहभागींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर (मो. ९३५९४०३८९१) किंवा अमृत पुणे जिल्हा कार्यालय (मो. ९११२२२८७६७) येथे संपर्क साधावा.

नोंदणीची सुविधा अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Sheetal kulkarni News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 03:16 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: Sheetal kulkarni News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 03:16 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement