संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटर व 'अमृत' संस्थेमध्ये सामंजस्य करार; नवउद्योजकांना मिळणार नवी संधी

तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एसजीबीएयू रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्था, पुणे यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
या कराराअंतर्गत विद्यापीठाचे इन्क्युबेशन सेंटर आणि 'अमृत' संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इन्क्युबेशन उपक्रम राबविण्यात येणार असून, राज्यातील नवउद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटर व 'अमृत' संस्थेमध्ये सामंजस्य करार; नवउद्योजकांना मिळणार नवी संधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात २५ नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सची निवड करण्यात येणार असून, प्रत्येक स्टार्टअपला एका वर्षासाठी दरमहा ₹२५,००० इतकी सीड फंडिंग/फेलोशिप देण्यात येईल. तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, को-वर्किंग स्पेस आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान, बायोटेक, माहिती तंत्रज्ञान (IT), आयओटी (IoT) यांसारख्या आधुनिक क्षेत्रातील स्टार्टअप्सना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असून, पुढील तीन वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहे. करारावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरोकर, सीईओ श्री. आनंद यादव, श्री. अमोल हिरळकर, 'अमृत' संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर तसेच जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश हरीश कथलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम राज्यातील नवउद्योजकांसाठी संकल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत सर्वांगीण सहाय्य देणारा ठरणार असून, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: ऋषिकेश हरिश कथलकर News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 09:06 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: ऋषिकेश हरिश कथलकर News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 09:06 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement