अमृतचं मोफत EDP प्रशिक्षण 20 जुलैपासून; 18 जुलैपर्यंत नाव नोंदणीची मुदत

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे २० जुलै २०२६ पासून मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षण सुरू होत आहे. इच्छुक युवक-युवती आणि लाभार्थ्यांनी १८ जुलै २०२६ पर्यंत नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृतचं मोफत EDP प्रशिक्षण 20 जुलैपासून; 18 जुलैपर्यंत नाव नोंदणीची मुदत  मुख्य फोटो
अमृतचं मोफत EDP प्रशिक्षण 20 जुलैपासून; 18 जुलैपर्यंत नाव नोंदणीची मुदत  अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : स्वतःचा धंदा सुरू करायचा असेल किंवा चालू धंदा अजून वाढवायचा असेल, तर अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) तर्फे राबविण्यात येणारं उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षण चांगली संधी ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती आणि लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणासाठी १८ जुलै २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी, असं आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

 या १० दिवसांच्या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करण्यापासून बँक कर्ज, शासकीय योजना, मार्केटिंग, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, डिजिटल विक्री आणि उद्योग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे

हे प्रशिक्षण २० जुलै पासून सुरू होणार असून एकूण १० दिवसांचं असणार आहे. त्यात पहिले ४ दिवस अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात रोज २ तास ऑफलाइन प्रशिक्षण होईल. त्यानंतर ६ दिवस ऑनलाइन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सहभागी लाभार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा, व्यवसायाचं नियोजन कसं करायचं, भांडवल आणि बँक कर्ज कसं मिळवायचं, शासनाच्या योजना आणि अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा, मार्केटिंग, व्यवसाय व्यवस्थापन, ब्रँडिंग, ट्रेडमार्क, नफा-तोटा, आर्थिक नियोजन, उद्योगासाठी लागणारी कागदपत्रं, कच्चा माल कुठून घ्यायचा, तयार मालाची विक्री कशी करायची, बाजारपेठ कशी शोधायची याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केलं जाणार आहे.

याशिवाय अमृत पेठ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री कशी करायची, याचीही माहिती दिली जाणार आहे. लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, ट्रेडिंग आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे.

अमृतच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग सुरू केले असून, अनेक जण व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यामुळे ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांनी ही संधी न दवडता १८ जुलैपूर्वी नाव नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आलं आहे.

रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना, असा संदेशही अमृतच्या वतीने देण्यात आला आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 05:12 PM News publication time | Views: 281 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 05:12 PM News publication time | Views: 281 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement