"उद्योजकतेकडे एक पाऊल, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल" अमृतची आयात निर्यात योजना.

अमृतच्या लक्षित गटातील जाती या उमेदवारांसाठी आयात निर्यात वर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना मार्गदर्शन करणे नवीन व्यवसाय उभारणीस प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

"उद्योजकतेकडे एक पाऊल, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल" अमृतची आयात निर्यात योजना. मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातीना कुठल्याही स्वतंत्र शासकिय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील, अमृतच्या लक्षित गटातील जातींचे,आर्थिक दुर्बल घटकांतील युवक/युवती जे सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत असे उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अर्जदाराचे वय २१ ते ६० वर्ष या दरम्यान असावे.

अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

लाभार्थी हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील अर्जदार असणे आवश्यक आहे.

अर्जदार किमान बारावी पास असावा.

प्रशिक्षणानंतर लाभयार्थ्याना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

अधिक माहिती साठी जिल्ह्यातील अमृत कार्यालयाला भेट द्या.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 03:24 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 03:24 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement