अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणास सुरुवात.

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणास" सुरुवात झाली आहे.

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणास सुरुवात. मुख्य फोटो
अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणास सुरुवात. अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर :- अमृत कार्यालय येथे "उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाची" सुरुवात.

प्रथमेश कुलकर्णी (अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक) यांच्या हस्ते व राहुल पटवेकर (ठाणे जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी), मिलिंद भणगे (जनता सहकारी बँकेचे सहाय्यक शाखाधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

प्रशिक्षणाची सुरुवात भारत माता प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रस्ताविक करून मार्गदर्शन केले. शाखाधिकारी राहुल पटवेकर यांनी 'बँक कर्ज प्रकरण, लागणारी कागदपत्रे, कर्जाचे प्रकार' इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जनता सहकारी बँकेचे मिलिंद भणगे सर यांनी ही माहिती दिली. प्रशिक्षणातील लाभार्थ्यांनी बँकिंग क्षेत्राशी निगडीत अनेक प्रश्नांचे निरसन झाल्याने समाधान व्यक्त केले. जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी सर्वांचे आभार मानून समारोप केला.

यावेळी अमृत मित्र वैभव कुलकर्णी व अमृत सखी गौरी कुलकर्णी हेही उपस्थित होते. या प्रशिक्षणात एकूण पुढील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 02:57 PM News publication time | Views: 153 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 02:57 PM News publication time | Views: 153 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement