महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे 'हरित उद्योग' (Green Business) क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, 'अमृत आणि 'कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने "अमृत-सक्षम" हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे.
महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे 'हरित उद्योग' क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर, 'अमृत' (AMRUT) आणि 'कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने "अमृत-सक्षम" हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे.कचरा ही समस्या नाही तर उत्पन्नाचा उत्तम स्रोत..!
रोजच्या कचऱ्यातून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकतो, हे अनेकांनी सिद्ध केले आहे.
सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनवणे.
* प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे.
* 'रिसोर्स रिकव्हरी सेंटर' (RRR) सुरू करणे.
योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास तुम्हीही या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करू शकता.
'अमृत-सक्षम' नेमके काय आहे? हे केवळ एक पुस्तकी प्रशिक्षण नाही, तर 'संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा' एक परिपूर्ण प्रवास आहे. यामध्ये या व्यवसायामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराला खालील गोष्टींचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळेल.
* योग्य व्यवसायाची निवड करणे. * आर्थिक नियोजन आणि बँक लोन प्रक्रिया समजून घेणे. * शासकीय योजना व अनुदानाचा लाभ घेणे. * उत्पादनाची विक्री आणि बाजारपेठ मिळवणे.
या क्षेत्रातील कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही. खालीलपैकी कोणीही यात अर्ज करू शकतात. तथापि अमृत च्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध योजनांचे लाभ मिळू शकतात.
* स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती * महिला बचत गट (SHGs) * विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक * निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी
प्रशिक्षणानंतर तुम्हाला काय मिळणार? ● तज्ज्ञांचे मार्गदर्शन: क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांचे थेट पाठबळ. ● नेटवर्किंग: बाजारपेठेतील मोठे खरेदीदार आणि इतर उद्योजकांशी थेट संपर्क
अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा:-
संपर्क क्रमांक- ७३९१०६५४७३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment