सातारा जिल्ह्यात 'एक कुटुंब – एक वृक्ष' अभियानास प्रारंभ

जुलै ते सप्टेंबरमध्ये १०० वृक्ष लागवडीचा अमृत संस्थेचा निर्धार

सातारा जिल्ह्यात 'एक कुटुंब – एक वृक्ष' अभियानास प्रारंभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

एक कुटुंब – एक वृक्ष': अमृत संस्थेचा फलटण तालुक्यात हरित संकल्प


फलटण: पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी अमृत संस्थेच्या वतीने फलटण तालुक्यात "एक कुटुंब – एक वृक्ष" या हरित अभियानाची आजपासून उत्साहात सुरुवात करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.


अमृत संस्थेने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत १०० वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला असून, या अभियानाची आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या विविध उपक्रमांशी जोडलेल्या कुटुंबांच्या सहभागातून फलटण तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.


या उपक्रमाचा उद्देश केवळ वृक्ष लागवड करणे नसून, प्रत्येक लावलेल्या वृक्षाचे संगोपन व संवर्धन करून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करणे हा आहे. वाढते प्रदूषण, बदलणारे हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


आगामी काळात फलटण तालुक्यात अधिकाधिक कुटुंबांचा या उपक्रमात सहभाग वाढवून "एक कुटुंब – एक वृक्ष" हा संकल्प प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा अमृत संस्थेचा मानस आहे. पर्यावरणपूरक आणि हरित फलटण घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement