अमृत जिल्हा कार्यालय राजवाडा (सांगली) येथे शासकीय दाखला शिबीर

शिबीरात अमृत संस्थेच्या विविध योजनांसाठी आवश्यक असलेले दाखले, अधिवास प्रमाणपत्र, कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, EWS प्रमाणपत्र इत्यादी काढण्यासाठी सहाय्यता दिली जाणार आहे. विद्यार्थ्याना सुद्धा प्रवेश प्रक्रियेसाठी ही दाखले आवश्यक असल्याने त्यांना याची मदत होणार आहे.

 अमृत जिल्हा कार्यालय राजवाडा (सांगली) येथे शासकीय दाखला शिबीर मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालय राजवाडा सांगली येथे शासकीय दाखला शिबीर राबविण्यात येणार आहे. शिबीर दिनांक १५ जुलै २०२६ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० वाजता ते सायंकाळी ५.०० वाजता चालू राहणार आहे. शिबीरात अमृत संस्थेच्या विविध योजनांसाठी आवश्यक असलेले दाखले, अधिवास प्रमाणपत्र, कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, EWS प्रमाणपत्र इत्यादी काढण्यासाठी सहाय्यता दिली जाणार आहे. विद्यार्थ्याना सुद्धा प्रवेश प्रक्रियेसाठी ही दाखले आवश्यक असल्याने त्यांना याची मदत होणार आहे. शिबीराचा उद्देश व लाभ: अमृत संस्थेच्या योजनांसाठी विविध दाखला प्रक्रिया करण्यात अडचणी येणाऱ्या लाभार्थींना सहाय्यता देणे हा शिबीरामागे मुख्य उद्देश आहे. यामुळे योजनांसाठी अर्ज करताना कागदपत्रांची पूर्तता, अर्ज तपासणी आणि प्रक्रिया अधिक सोपी होईल.

शिबीरात प्रामुख्याने खालील प्रकारचे काम करता येईल: - उत्पन्नाचा दाखला, EWS प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र - अमृत योजनांच्या अर्जांसाठी आवश्यक दस्तऐवजांचे संपूर्ण सेट तयार करणे आवश्यक माहिती  शिबीर अमृत जिल्हा कार्यालय राजवाडा, सांगली येथे राबविण्यात येणार आहे.  दिनांक: १५ जुलै २०२६ ते २५ जुलै २०२६  वेळ: सकाळी १०.०० वाजता ते सायंकाळी ५.०० वाजता  लक्षित गटातील सर्व नागरिकानी स्वतःच्या सर्व मूळ कागदपत्रे (आधार, जन्मतारीख, शिक्षण, उत्पन्न, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला इ.) उपलब्ध करून घ्यावीत.  शिबीरात अर्जदाराने स्वतःहून उपस्थिती दर्शवून आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अमृतच्या लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/ आर्य वैश्य इत्यादि जाती आहेत. अमृत जिल्हा कार्यालय राजवाडा सांगली येथे दिनांक १५ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत शासकीय दाखला शिबीर सुरू असल्याने, योजनांसाठी दाखला आवश्यक असलेल्या लक्षित गटातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेऊन स्वतःच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयातून करण्यात आले आहे. संपर्क:- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), सांगली जिल्हा कार्यालय, अप्पर तहसील कार्यालया समोर, राजवाडा, सांगली ४१६४१६ जिल्हा कार्यालय:-९११२२२८७६६


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 04:08 PM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 04:08 PM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

विश्वास कर्वे
14-07-2026 04:24 PM

अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे

Write a Comment
0 / 50 words
Advertisement