महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कुशाग्रा इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत-सक्षम’ या उपक्रमाद्वारे राज्यातील युवक, महिला, बचत गट आणि इच्छुक उद्योजकांना कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योग उभारणीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षण, मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, बँक कर्ज प्रक्रिया आणि बाजारपेठ उपलब्ध करून देत हरित उद्योगाला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कचरा व्यवस्थापन हे आता केवळ स्वच्छता राखण्यापुरते मर्यादित राहिले नसून ते उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाचे प्रभावी माध्यम बनले आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरण संरक्षणाची वाढती गरज आणि पुनर्वापर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत. या संधींचा लाभ राज्यातील युवक, महिला आणि उद्योजकांना मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कुशाग्रा इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्लास्टिक, कागद आणि काच पुनर्वापर, रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणी, सेंद्रिय कचऱ्यापासून उपयुक्त उत्पादन निर्मिती तसेच इतर पर्यावरणपूरक व्यवसाय संधींबाबत इच्छुकांना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. उद्योजकतेच्या प्रवासात अनेकांना व्यवसायाची निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना व अनुदान याबाबत अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर ‘अमृत-सक्षम’ उपक्रमांतर्गत व्यवसाय निवडीपासून ते बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहाय्याने उद्योग उभारणीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाणार असून व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा करण्यासाठी आवश्यक सहकार्य दिले जाणार आहे. 'अमृत-सक्षम' नेमके काय आहे?
हे केवळ एक पुस्तकी प्रशिक्षण नाही, तर 'संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा' एक परिपूर्ण प्रवास आहे. यामध्ये या व्यवसायामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराला खालील गोष्टींचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळेल..: योग्य व्यवसायाची निवड करणे. आर्थिक नियोजन आणि बँक लोन प्रक्रिया समजून घेणे. शासकीय योजना व अनुदानाचा (Subsidy) लाभ घेणे. उत्पादनाची विक्री आणि बाजारपेठ (Market) मिळवणे.
या उपक्रमात कोण सहभागी होऊ शकते?
या क्षेत्रातील कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही. खालीलपैकी कोणीही यात अर्ज करू शकतात. तथापि अमृत च्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध योजनांचे लाभ मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती महिला बचत गट (SHGs) विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी सामाजिक संस्था (NGOs) व पर्यावरणप्रेमी नागरिक
प्रशिक्षणानंतर तुम्हाला काय मिळणार?
● तज्ज्ञांचे मार्गदर्शन: क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांचे थेट पाठबळ.
● शासकीय साहाय्य: अमृतच्या लक्षीत गटातील पात्र उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी 'अमृत'च्या विविध योजनांतर्गत विशेष मदत. यामध्ये अमृत वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा समावेश आहे.
● नेटवर्किंग: बाजारपेठेतील मोठे खरेदीदार आणि इतर उद्योजकांशी थेट संपर्क
नोंदणी कशी करावी?
नोंदणी अत्यंत सोपी आहे! खालील लिंकवर क्लिक करून आपला अर्ज भरा : https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ किंवा अमृत च्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा. यासंदर्भात इतर तपशील आणि माहितीसाठी अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाला भेट द्या किंवा अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधून माहिती घेता येईल. यांचे संपर्क क्रमांक व पत्ता अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुढील प्रक्रिया:
तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, 'अमृत-सक्षम' टीम तुमच्याशी फोनद्वारे संपर्क साधेल. पात्र उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
युट्युब लाईव्ह सत्र :
या व्यवसायासंदर्भात प्राथमिक माहिती मिळण्यासाठी AMRUT youtube वर (https://youtube.com/@mahaamrutpune?si=JZPTLSS9H9bPvnOf ) दिनांक १६ जुलै २०२६ ला ४ वाजता प्रसारित होणाऱ्या लाईव्ह सत्रामध्ये सहभागी व्हावे आणि प्राथमिक माहिती प्राप्त करून घ्यावी.
या उपक्रमात अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मुंबई सुद्धा सामील होते आहे. आर्टीच्या लाभार्थी समूहाला सुद्धा याचा निश्चितच फायदा होईल. हा उपक्रम सुरू केल्याबद्दल श्री विजय जोशी सर अमृत चे महासंचालक आणि कुशाग्र संस्था यांचे AARTI चे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील वारे यांनी अभिनंदन केले आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३२ अमृत-सक्षम.. सक्षम उद्योजक.. स्वावलंबी महाराष्ट्र..! संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा..!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment