कौशल्यासोबत संस्कारांची जोड; लातूरमध्ये अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणात अमृत वर्गाचे आयोजन

लातूर येथे सुरू असलेल्या अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणामध्ये नियमित घेतला जाणारा 'अमृत वर्ग' प्रशिक्षणार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देत आहे. कौशल्यासोबत संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैली रुजविणारा हा उपक्रम अमृत संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

कौशल्यासोबत संस्कारांची जोड; लातूरमध्ये अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणात अमृत वर्गाचे आयोजन  मुख्य फोटो
कौशल्यासोबत संस्कारांची जोड; लातूरमध्ये अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणात अमृत वर्गाचे आयोजन  अतिरिक्त फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने लातूर येथे सुरू असलेल्या अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षणच नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम घडविण्यासाठी 'अमृत वर्ग' हा विशेष उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. अमृत संस्थेचा ठाम विश्वास आहे की, फक्त व्यवसाय शिकवून उद्योजक किंवा कुशल व्यक्ती घडत नाही; त्यासाठी चांगले व्यक्तिमत्त्व, सका रात्मक विचार, शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी मन-शरीरही तितकेच आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने अमृत वर्गाचे नियमित आयोजन केले जाते. या वर्गामध्ये योग, प्राणायाम, व्यायाम, प्रेरणादायी सुविचार, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व कौशल्य, सांघिक खेळ, संवाद कौशल्य, शिस्त, वेळेचे नियोजन तसेच सकारात्मक जीवनमूल्यांवर आधारित विविध उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून, संघभावना, जबाबदारीची जाणीव, नेतृत्वगुण आणि निरोगी जीवनशैली विकसित होत आहे. यावेळी श्री. चिंतेश जोशी यांनी अमृत वर्गाचे मार्गदर्शन करताना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी नियमित व्यायाम, संतुलित दिनचर्या, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, असे सांगितले. कौशल्यासोबत उत्तम चारित्र्य आणि चांगल्या सवयी जोपासण्याचे आवाहनही त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केले. प्रशिक्षणार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दररोज होणाऱ्या अमृत वर्गामुळे प्रशिक्षणात उत्साह वाढत असून, मन प्रसन्न राहण्यास, तणाव कमी होण्यास आणि नव्या उमेदीने शिकण्यास मदत होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच MCED चे अमोल दिवेकर यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले. अमृत संस्था केवळ प्रशिक्षण देणारी संस्था नसून, समाजाला सक्षम, सुसंस्कृत, निरोगी आणि स्वावलंबी नागरिक घडविण्याचे कार्य करत आहे. रोजगार आणि उद्योजकतेबरोबरच संस्कार, शिस्त, आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांना समान महत्त्व देणारा 'अमृत वर्ग' हा उपक्रम प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया निर्माण करत आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 12:42 PM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 12:42 PM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement