महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (AMRUT) च्या वतीने राबविण्यात आलेल्या 'ड्रोन पायलट व सर्वे मॅपिंग ड्रोन प्रशिक्षण' योजनेने मालेगावातील तरुणांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे.
मालेगाव:शहरातील तीन युवकांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या आधुनिक संधी उपलब्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल या युवकांनी 'अमृत' संस्था आणि नाशिक जिल्हा टीमचे विशेष आभार मानले आहेत. या योजनेचा लाभ घेतलेले मालेगावचे रहिवासी वंश विशाल शर्मा, गिरीश भालचंद्र जोशी आणि हर्षल शर्मा यांनी प्रशिक्षणाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणादरम्यान अनुभवी मार्गदर्शकांकडून ड्रोनचे तांत्रिक ज्ञान, सुरक्षित उड्डाण (Safe Flying), सर्वे मॅपिंग आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके (Practical Training) यासह आधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा, याचे आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्जाचे प्रशिक्षण मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
"अमृत संस्थेची संपूर्ण व्यवस्था अतिशय उत्कृष्ट होती. येथील कर्मचारी अत्यंत सहकार्यशील असून त्यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केले. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली."— लाभार्थी युवक
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहेत
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा- अमृत नाशिक जिल्हा कार्यालय, १, सदानंद सोसायटी, स्वप्निल पार्क, टिळकवाडी, नाशिक - ४२२००२ मोबाईल नंबर - 9112228770
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment