नंदुरबार येथे दिनांक २० व २१ जुलै रोजी अमृतपेठचे आयोजन

दिनांक २० व २१ जुलै २०२६ रोजी जयवंत चौक, जैन स्थानक जवळ ब्राम्हणवाडी नंदुरबार येथे अमृत पेठ भरवली जाणार आहे.

नंदुरबार येथे दिनांक २० व २१  जुलै रोजी अमृतपेठचे आयोजन  मुख्य फोटो
नंदुरबार येथे दिनांक २० व २१  जुलै रोजी अमृतपेठचे आयोजन  अतिरिक्त फोटो

दिनांक 20-21 जुलै रोजी जयवंत चौक, जैन स्थानक जवळ ब्राम्हणवाडी नंदुरबार येथे अमृत पेठ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला, सूक्ष्म उद्योजक, कारागीर, शेतकरी उत्पादक, गृहउद्योग व्यावसायिक तसेच नवउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत "वोकल फॉर लोकल" या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. सातपुड्यातील नैसर्गिक साधनांपासून तयार केलेले वस्तू, औषधं, व अन्य चविष्ट पदार्थ ह्या अमृत पेठ मध्ये सादर होणार आहेत अमृत पेठमध्ये महिला उद्योजिकांनी तयार केलेली विविध उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, वस्त्र व परिधान, गृहउपयोगी साहित्य, कृषी व ग्रामीण उत्पादने तसेच इतर आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध असतील. दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून स्थानिक उद्योजकांना व्यवसायवृद्धीची नवी दिशा मिळणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या अमृतपेठ उपक्रमास भेट देऊन स्थानिक उद्योजकांना पाठबळ देण्याचे कार्य करावे,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement