शिरूर : येथील सिटी बोरा महाविद्यालयामध्ये अमृत संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष भेट आयोजित करण्यात आली होती
शिरूर येथील सिटी बोरा महाविद्यालयात अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती
शिरूर : येथील सिटी बोरा महाविद्यालयामध्ये अमृत संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष भेट आयोजित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. के. सी. मोहिते सर यांची भेट घेऊन अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांचे उद्दिष्ट तसेच समाजोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच महाविद्यालयातील मानसशास्त्र व तर्कशास्त्र विभाग प्रमुख मा. श्री. के. एन. गाडेकर सर यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या "मानस मित्र" या महत्त्वपूर्ण योजनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेअंतर्गत मानसिक आरोग्य जनजागृती, समुपदेशन तसेच विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मानसिक आधार उपलब्ध करून देण्याचे कार्य कसे केले जाते याची माहिती त्यांना देण्यात आली.
यावेळी महाविद्यालय प्रशासनाने अमृत संस्थेच्या सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यात अशा योजनांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment