अमृत पर्यटन अंतर्गत अहिल्यानगर येथून अकोले तालुक्यातील भंडारदरा व सिन्नर(जि.नाशिक) मधील डुबेरे येथील बर्वे वाडा (श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान) येथे दिनांक- २६ जुलै रोजी आयोजित केली आहे.
हाराष्ट्रातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांची माहिती कळावी आणि हा वारसा पर्यटनाच्या निमित्ताने आपल्याला माहीत व्हावा, या उद्देशाने अहिल्यानगर अमृत संस्थेच्या "अमृत पर्यटन" अंतर्गत एकदिवसीय पर्यटन सहल आयोजित केली आहे.
ही सहल अकोले तालुक्यातील भंडारदरा व सिन्नर (जि. नाशिक) मधील डुबेरे येथील बर्वे वाडा (श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान) येथे जाणार आहे.
पर्यटन स्थळे : भंडारदरा धरण, धबधबा, अमृतेश्वर मंदिर आणि डुबेरे येथील बर्वे वाडा.
दिनांक: २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता अमृत कार्यालय, अहिल्यानगर येथून प्रस्थान होणार आहे आणि रात्री १०:०० वाजेपर्यंत परतणार आहे.
प्रवास शुल्क : प्रत्येकी रु. १३००/- फक्त
उपलब्ध सुविधा : एक वेळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा, दोन पाण्याच्या बाटल्या तसेच सामान्य बसने प्रवास असणार आहे.
एकूण प्रवासी मर्यादा: २६
सहल नोंदणीची अंतिम मुदत: दि. २४ जुलै, संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.
तरी त्वरा करा, काहीच जागा शिल्लक आहेत! आजच आपली जागा निश्चित करा.
निसर्गसौंदर्य, इतिहास आणि अविस्मरणीय आठवणींनी भरलेला आनंददायी प्रवास अनुभवा!!
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- अबोली सराफ :-95525 59889
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment