अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत Cinematography ड्रोन प्रशिक्षण पूर्ण केलेले विनोद बालाजी वट्टमवार यांनी अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर : अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत Cinematography ड्रोनचं प्रशिक्षण घेतलेले विनोद बालाजी वट्टमवार यांनी आज अमृतच्या विभागीय आणि जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी अमृतच्या जिल्हा टीमनं त्यांचं मनापासून स्वागत केलं. विनोद वट्टमवार यांनी सांगितलं की, " आता ते Cinematography ड्रोनच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहेत. हा व्यवसाय उभा करताना त्यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करायला मोठा आधार मिळणार आहे". यावेळी बोलताना ते म्हणाले, "आमच्या समाजासाठी पहिल्यांदाच अशी योजना खरंच काम करताना दिसतेय. त्यामुळे खूप बरं वाटतंय. अमृत संस्थेनं आम्हाला मोठी संधी दिली." त्यांनी अमृत संस्थेचे मनापासून आभार मानले. पुढच्या काळात आपणही अमृत संस्थेसोबत राहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर .पि को :४३१००९ संपर्क:- 7391065475 / 94032 00606
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment