वरोऱ्यात अमृतच्या योजनांचा प्रचार-प्रसार; उद्योग विकासासाठी समाजाचा सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या माध्यमातून वरोरा येथे कोमटी /आर्य वैश्य समाजाची मार्गदर्शनपर बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत अमृतच्या विविध स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता विकास योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.

वरोऱ्यात अमृतच्या योजनांचा प्रचार-प्रसार; उद्योग विकासासाठी समाजाचा सकारात्मक प्रतिसाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

बैठकीमध्ये विशेषतः बेकरी उद्योग, आयात-निर्यात (इम्पोर्ट-एक्स्पोर्ट) व्यवसाय, ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी यांसारख्या भविष्यातील रोजगारक्षम व उत्पन्नवाढीच्या संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, शासकीय योजनांचा लाभ, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आगामी उपक्रमांचे नियोजन यावरही उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. उपस्थितांनी अमृतच्या उपक्रमांचे कौतुक करत या माध्यमातून युवक, महिला आणि इच्छुक उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. समाजातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी अतुल गुंडावर, मनोज पद्मावर, अमर उपगणलावार, किशोर उत्तरवार, ओम उत्तरवार उपस्थित होते. उपस्थितांनी अमृतच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774, 9890746453 अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, वत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 09:17 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 09:17 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement