कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराकडे वाटचाल; अमृततर्फे विविध मोफत प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने अकोला जिल्ह्यात विविध मोफत स्वयंरोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने अरी वर्क, ब्युटी पार्लर, ई-व्हेईकल रिपेअरिंग, अन्न प्रक्रिया उद्योग आदी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.

कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराकडे वाटचाल; अमृततर्फे विविध मोफत प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने अकोला जिल्ह्यात स्वयंरोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत विविध मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये अकोला येथे अरी वर्क (हस्तकला), ई-व्हेईकल रिपेअरिंग व अन्न प्रक्रिया उद्योग, अकोट येथे आरी वर्क, तेल्हारा येथे बेकरी आणि मूर्तीजापूर येथे ब्युटी पार्लर हे अभ्यासक्रम उपलब्ध असून, सहभागी उमेदवारांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या संधी, रोजगारासाठी आवश्यक व्यावहारिक अनुभव तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामुळे युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व आत्मविश्वास मिळण्यास मदत होणार आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी आहे, ज्यांना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत तत्सम योजनेचा लाभ मिळालेला नाही. पात्र उमेदवारांसाठी प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करावा. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९११२२२७६३६, ८२६२८३३२७७ किंवा ८९७५५२२५९१ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी परिसर, अकोला येथे भेट द्यावी. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement