अमृत कार्यालय, लातूर येथे लाभार्थ्याची भेट; योजनांची माहिती घेत IIT अर्थसाहाय्य योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय.

लातूर : अमृत कार्यालय, लातूर येथे श्री. मनोज अग्रवाल यांनी सदिच्छा भेट देऊन अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.

अमृत कार्यालय, लातूर येथे लाभार्थ्याची भेट; योजनांची माहिती घेत IIT अर्थसाहाय्य योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय. मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : अमृत कार्यालय, लातूर येथे श्री. मनोज अग्रवाल यांनी सदिच्छा भेट देऊन अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना विविध शैक्षणिक, कौशल्य विकास व लाभार्थी अर्थसाहाय्य योजनांबाबत मार्गदर्शन केले. या चर्चेदरम्यान श्री. अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांची मुलगी सध्या आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून, अमृत संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या "IIT अर्थसाहाय्य" योजनेचा लाभ घेण्याची त्यांची इच्छा आहे. त्यानुसार आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. श्री. अग्रवाल यांनी अमृत संस्थेच्या उपयुक्त योजनांचे कौतुक करत अशा योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, भविष्यातही अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. यावेळी अमृत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 02:47 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 02:47 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement