धुळ्यात १७ व १८ जुलै रोजी भरणार ‘अमृत पेठ’ – महिला उद्योजक व स्थानिक उत्पादकांचे हक्काचे व्यासपीठ

अमृत पेठ या, दर्जेदार स्थानिक उत्पादने खरेदी करा, आपल्या उद्योजकांना साथ द्या आणि #VocalForLocal अभियानाला बळ द्या!

धुळ्यात १७ व १८ जुलै रोजी भरणार ‘अमृत पेठ’ – महिला उद्योजक व स्थानिक उत्पादकांचे  हक्काचे व्यासपीठ मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमृत जिल्हा कार्यालय, धुळे, श्री परशुराम युवा मंच आणि अमृत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ जुलै २०२६ रोजी धुळे येथे "अमृत पेठ" या विशेष विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला, सूक्ष्म उद्योजक, कारागीर, शेतकरी उत्पादक, गृहउद्योग व्यावसायिक तसेच नवउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत "वोकल फॉर लोकल" या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.


अमृत पेठमध्ये महिला उद्योजिकांनी तयार केलेली विविध उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, वस्त्र व परिधान, गृहउपयोगी साहित्य, कृषी व ग्रामीण उत्पादने तसेच इतर आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध असतील. दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून स्थानिक उद्योजकांना व्यवसायवृद्धीची नवी दिशा मिळणार आहे.


अमृत पेठ प्रदर्शनात स्टॉल नोंदणी अजूनही चालू आहे. तेव्हा लवकरात लवकर आपला स्टॉलही बुक करा आणि ह्या अनोख्या उपक्रमात सहभागी व्हा.


या प्रदर्शनात अनेक दर्जेदार उत्पादनांबरोबरच अमृत संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि योजनांची माहितीसुद्धा उपलब्ध होणार आहे; म्हणजेच खरेदीच्या आनंदासोबत, भविष्यातील व्यवसाय संधींची माहितीही मिळणार आहे.


अमृत जिल्हा व्यवस्थापक श्री. हेमंत पाठक यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे तसेच "अमृत पेठ" उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

.अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय धुळे , २६,महाराणा प्रताप कॉलनी,जुने चिरंतन हॉस्पिटल जवळ देवपूर, धुळे संपर्क क्र. – 9112228772 / 9822829555

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: vaishali kulkarni News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 03:41 PM News publication time | Views: 211 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news
Publisher: vaishali kulkarni News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 03:41 PM News publication time | Views: 211 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement