अहिल्यानगर येथे लक्षित गटातील व्यवसायिक महिलांची बैठक संपन्न

अहिल्यानगर येथील अमृत कार्यालय येथे अमृत संस्थेच्या लक्षित गटातील व्यवसायिक महिला यांची बैठक संपन्न झाली

अहिल्यानगर येथे लक्षित गटातील व्यवसायिक महिलांची बैठक संपन्न मुख्य फोटो
अहिल्यानगर येथे लक्षित गटातील व्यवसायिक महिलांची बैठक संपन्न अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे आज अमृत संस्थेच्या लक्षित गटातील व्यवसायिक महिला यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अमृत संस्थेच्या विविध योजना यांविषयी जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी मार्गदर्शन केले. विशेषत: अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण, अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम, अमृत पर्यटन, व्याज परतावा योजना, अमृत पेठ थेट बाजारपेठ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती.अमृत संस्थेच्या विविध योजना लक्षित गटापर्यंत पोहचविण्या साठी अहिल्यानगर अमृत टीम मार्फत अशा विविध बैठका आयोजित केल्या जातात.यासाठी विशेष सहकार्य सौ. अश्विनी देवदत्त मुंगी यांनी केले तसेच त्यांनी मार्गदर्शनही केले. या बैठकीसाठी पुढील व्यावसायिक महिला उपस्थित होत्या. सौ.अश्विनी देवदत्त मुंगी , सौ.किर्ती जोशी, सौ.राशसभूवनकर ज्योती सुधीर, सौ. कुलकर्णी अपर्णा श्रीनिवास, सौ.सारीका आनंद कुकडे , सौ.अबोली सराफ , सौ.केतकी जोशी, सौ.मनिषा कुलकर्णी, सौ.वृशाली गायकैवारी, सौ.प्रिया जानवे, सौ.वर्षा संजय जोशी, सौ.गौरी गिरीश मुळे, सौ.प्रियंका ललित कुलकर्णी, सौ.रेणुका संतोष कुसुरकर

अमृत सखी गौरी कुलकर्णी हिने सर्वांचे आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 02:50 PM News publication time | Views: 149 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 02:50 PM News publication time | Views: 149 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement