महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण बॅचचा कोल्हापुरात यशस्वी समारोप झाला. या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांनी ब्युटी, मेकअप, स्टाइलिंग आणि ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले.
**कोल्हापुरात महिलांसाठी अमृतच्या ग्लॅमर प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद! कौशल्यातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल** कोल्हापूर : महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण बॅचचा कोल्हापुरात यशस्वी समारोप झाला. या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांनी ब्युटी, मेकअप, स्टाइलिंग आणि ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले. या उपक्रमामुळे महिलांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची तसेच भविष्यात स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याची दिशा मिळाली आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, अनेक महिलांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे कौशल्याधारित उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. कोल्हापुरातील या प्रशिक्षण बॅचच्या यशस्वी पूर्णत्वामुळे ग्लॅमर आणि ब्युटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment