अमृतच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवती, महिला व इच्छुक उद्योजकांनी त्वरित नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
हिंगोली, दि. १३ जुलै २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) साठी हिंगोली जिल्ह्यात नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवती, महिला, बचत गट सदस्य, बेरोजगार तसेच इच्छुक उद्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजना व कर्जप्रक्रिया, विपणन, आर्थिक नियोजन, डिजिटल व्यवहार, व्यवसाय व्यवस्थापन तसेच उद्योग उभारणीसंदर्भातील विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नावनोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. प्रशिक्षणाच्या वेळापत्रक, स्थळ व आवश्यक कागदपत्रांची माहिती जिल्हा कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली मो. : 7391065471
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment