छत्रपती संभाजी विद्यालय, सुहागण येथे अमृतवर्ग व सामाजिक समरसता उपक्रम उत्साहात

पूर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालयात अमृत संस्थेतर्फे अमृतवर्ग व सामाजिक समरसता उपक्रम उत्साहात पार पडला.

छत्रपती संभाजी विद्यालय, सुहागण येथे अमृतवर्ग व सामाजिक समरसता उपक्रम उत्साहात मुख्य फोटो
छत्रपती संभाजी विद्यालय, सुहागण येथे अमृतवर्ग व सामाजिक समरसता उपक्रम उत्साहात अतिरिक्त फोटो

पूर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालयात अमृत संस्थेतर्फे अमृतवर्ग व सामाजिक समरसता उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.


यावेळी शासनाच्या NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत पात्र ठरलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तसेच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या सहा विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले तसेच सामाजिक बांधिलकीचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान अमृत संस्थेचे अमृतमित्र अनंत जोगदंड यांनी विद्यार्थ्यांसाठी अमृतवर्ग घेतला. तसेच अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. विद्यालयातील शारीरिक शिक्षकालाही अमृतवर्गाची संकल्पना समजावून सांगण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आठवड्यातून दोन ते तीन दिवस नियमित अमृतवर्ग घेण्याची तयारी दर्शविली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर कल्याणकर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अमृत संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Anant Jogdand News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 644 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anant Jogdand News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 644 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement