नायगाव:- मिलेनिअम पब्लिक स्कूल, नायगाव येथे 'अमृत वर्गा'चा शानदार शुभारंभ!

विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच उच्च मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि एक सुजाण भारतीय नागरिक घडण्यास मदत व्हावी, या उद्देशाने मिलेनिअम पब्लिक स्कूल, नायगाव येथे 'अमृत वर्गा'चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला आहे.

नायगाव:- मिलेनिअम पब्लिक स्कूल, नायगाव येथे 'अमृत वर्गा'चा शानदार शुभारंभ! मुख्य फोटो
नायगाव:- मिलेनिअम पब्लिक स्कूल, नायगाव येथे 'अमृत वर्गा'चा शानदार शुभारंभ! अतिरिक्त फोटो

नायगाव:

श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संस्थाध्यक्ष मा. श्री. शिवराज पाटील होटाळकर साहेब( माझी शिक्षण व अर्थ सभापती जिल्हा परिषद नांदेड तथा राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष नांदेड ) यांच्या अनुमतीने आणि प्रेरणेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री.सोनमनकर सर व वडजे सर आणि श्री. डॉ.डी.व्ही. जोशी यांचे मोलाचे सहकार्य व सक्रिय योगदान लाभत आहे.

काय आहे 'अमृत वर्ग' उपक्रम?

'अमृत वर्ग' हा केवळ एक तासिका नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि *बालसंस्काराचा* एक अनोखा प्लॅटफॉर्म आहे. या वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खालील गोष्टींचे ज्ञान आणि संस्कार दिले जाणार आहेत:

 संस्कृती आणि इतिहास: भारतीय संस्कृतीची ओळख आणि आपल्या देशाला लाभलेल्या समृद्ध इतिहासाचे ज्ञान.

 वीर पुरुषांचे योगदान: देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि समाज घडवणाऱ्या थोर वीर पुरुषांच्या शौर्यगाथा.

  भारतीय विज्ञान आणि शोध: भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि प्राचीन ते आधुनिक शोधांची माहिती.

 संत, साहित्य आणि कला-क्रीडा: भारतीय संत परंपरा, साहित्याचा वारसा आणि विविध कला व क्रीडा प्रकारांची ओळख.

 *विविध उपक्रमांची रेलचेल

विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्यासाठी या वर्गात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने:

 श्लोक आणि स्तोत्र पठण (संस्कार आणि एकाग्रतेसाठी)

 समूह देशभक्तीपर गीते (देशप्रेम जागृत करण्यासाठी)

 मैदानी व बौद्धिक खेळ (शारीरिक आणि बुद्धिमत्ता विकासासाठी)

"बालपणापासूनच मुलांवर योग्य संस्कार झाले, तरच ती पुढे जाऊन देशाची सक्षम धुरा सांभाळू शकतील. 'अमृत वर्ग' हा याच ध्येयाने सुरू केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे."

अमृत कार्यालय, नांदेड व शाळा व्यवस्थापन 


या स्तुत्य उपक्रमाबद्दल नायगाव परिसरातील पालक वर्ग आणि सुजाण नागरिकांकडून मिलेनिअम पब्लिक स्कूलचे, संस्थाध्यक्ष मा. श्री. शिवराज पाटील होटाळकर साहेब आणि प्राचार्य श्री.सोनमनर व श्री. वडजे सर, श्री. जोशी सर यांचे भरभरून कौतुक होत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 11:20 AM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 11:20 AM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement