वरद बालक मंदिर शाळेत अमृत सखी मयुरी टेळकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या आनंदाने सहभाग नोंदविला.
वरद बालक मंदिर शाळेत अमृत सखी मयुरी टेळकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या आनंदाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व, विविध प्रकारची झाडे, पर्यावरण संवर्धनातील त्यांची भूमिका आणि वृक्षलागवडीचे महत्त्व याविषयी अतिशय सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजावी तसेच प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे जतन व संवर्धन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक व नैतिक विकासाला प्रोत्साहन देणारा हा अमृत वर्ग अमृत सखी मयुरी टेळकीकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
आपल्या परिसरात,शाळेत अमृत वर्ग घेण्यासाठी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment