हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवती व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या माध्यमातून Cloud Kitchen या वेगाने विकसित होत असलेल्या व्यवसाय क्षेत्राविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष YouTube LIVE मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे सत्र सोमवार, 13 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता AMRUT च्या YouTube Channel वर थेट प्रसारित होणार आहे. या मार्गदर्शन सत्रात Cloud Kitchen म्हणजे काय, या क्षेत्रातील वाढत्या व्यवसाय संधी, कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग, व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक नियोजन तसेच AMRUT कडून उपलब्ध होणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उद्योजकतेसाठीचे सहाय्य याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवती, महिला बचत गट, हॉटेल व खाद्य व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, गृहउद्योग सुरू करू इच्छिणारे तसेच नवउद्योजकांनी या मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी AMRUT च्या जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment