अहिल्यानगर मधील कोपरगाव येथील भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कुल येथे अमृत वर्गास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अहिल्यानगर मधील कोपरगाव येथील भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कुल येथे अमृत वर्गास विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद. दिनांक ११ जुलै २०२६ रोजी भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कुल,कोपरगाव,अहिल्यानगर येथे अमुत मित्र श्री संदिप देशपांडे यांच्या माध्यमातून अमृतवर्ग घेण्यात आला.. या वर्गात बौद्धिक चालना देणारे खेळ,गीत व घोषणा घेण्यात आल्या. अमृत वर्गात ५ वी व ६ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला.होती.सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग खूप छान होता आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक श्री निमोणकर सर , स्पोर्ट्स टीचर रिझवान सर आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले. विद्यार्थी यांना अमृतवर्ग खूप आवडला. त्यांनी आनंदाने सर्व उपक्रम केले आणि खूप उत्साह दाखवला. भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कुल कोपरगाव ने घेतलेला अमृतवर्ग यशस्वी झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवता येतील,असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.तसेच अमुत वर्ग मध्ये एकूण 50 विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थी आवडता खेळ म्हणून खो खो हा खेळ घेण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment