विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये,सकारात्मक विचार, शिस्त, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन याबाबत केले मार्गदर्शन
गंगाखेड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर बहुद्देशीय संस्था संचलित कराड इंटरनॅशनल स्कूल मध्ये अमृत वर्ग घेण्यात आला. या वर्गामध्ये प्रार्थना, बोधकथा आणि बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये,सकारात्मक विचार, शिस्त, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी मुलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत बोधकथा सादर केली विविध उपक्रम, प्रेरणादायी कथा, समूहचर्चा आणि कृतीप्रधान शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. या अमृत वर्गाला शाळेतील मुख्याध्यापिका सौ.रुपालीताई जोशी व शिक्षिका देखील उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत उपक्रमाचे कौतुक केले. अमृत परभणीचे जिल्हा उपव्यवस्थापक रवि कुलकर्णी यांच्याकडून उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर मुख्याध्यापिका सौ.रुपालीताई जोशी यांनी अमृत वर्ग नियमितपणे राबविण्यास सकारात्मकता दर्शविली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment